सोने तारण कर्ज हि अशी योजना आहे कि त्यामध्ये तुम्ही सोने न विकता त्यावर पैसे मिळवू शकता. आम्हाला माहित आहे कि सोन्याचे दागिने हे खूप मौल्यवान असतात म्हणून आम्ही एक सहज आणि जलद कर्ज मिळवून देण्यासाठी सोने तारण कर्ज योजना सादर केली आहे. सोने तारण कर्ज हे आवश्यक कागदपत्रे व सोने ह्यांची व्यवस्थित पडताळणी केल्या नंतरच मंजूर केले जाईल. तुमचे सोने आमच्याकडे सुरक्षित राहील याची ग्वाही देतो.